नवी दिल्ली : दीपिका पदुकोण बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. हॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील ज्युरी मेंबर म्हणून तिची निवडली झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. तर गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेनुसार जगातील सर्वात सुंदर महिला टॉप १० च्या यादीत समाविष्ट असणारी एकमेव महिला ठरली असताना आता फिफा वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये फिफा करंडक ट्रॉफीचे अनावरण करण्याचा सर्वात मोठा मान देखील तिला मिळाला आहे. त्यामुळे हा मान मिळवणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री म्ह्णून ओळखली जाणार आहे.
मिळालेलय माहितीनुसार, फीफा वर्ल्डकपचा फायनल १८ डिसेंबर २०२२ रोजी आहे. यासाठी दीपिका लवकरच कतारसाठी रवाना होणार आहे. कतारमधील लुसेल आयकॉनिक स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या फिफा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी चे अनावरण करण्याचे भाग्य भारताची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणारी दीपिका पदुकोण ही भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे. दीपिका पदुकोणनेच ती कतारला जात असल्याची माहिती दिली आहे. जगातील सर्वात मोठा इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फिफा’च्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय कलाकाराला हा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण फुटबॉल विश्व असणार आहे त्यात दीपिका ही फिफाची ट्रॉफी फायनलमध्ये अनावरण करणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरणार आहे