संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

औरंगाबाद ते दिल्ली प्रवास! इंडिगोची विमानसेवा सुरु

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबाद ते दिल्ली प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, हैदराबादनंतर आता दिल्लीला जाणार्‍या प्रवाशांसाठी इंडिगोची विमान सेवा आजपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाणार्‍या प्रवाशांना सकाळीच विमानाने जाता येणार आहे. विशेष म्हणजे आज सकाळी पहिल्याच दिवशी औरंगाबादहून 146 प्रवासी दिल्लीला विमानाने गेले.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीला जाण्यासाठी सकाळची विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची मागणी सुरु होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता इंडिगोकडून आज सकाळपासून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी प्रतिसाद देखील चांगला दिला. पहिल्या दिवशी औरंगाबादहून एकूण 146 प्रवासी सकाळच्या विमानाने दिल्लीत दाखल झाले. तर दिल्लीहून सकाळी पहिल्याच दिवशी 52 प्रवासी औरंगाबादला आले. तर भविष्यात प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami