संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

औरंगाबादमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती! भावाकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात ‘सैराट” ची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टापरगावात ही घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने प्रियकर विशाल रमेश लव्हाळे याची निर्घृण हत्या केली आहे.विशाल रमेश लव्हाळे याचे टापरगावातील कृष्णा पवार याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते.कृष्णाला याची माहिती समजताच त्याला विशालचा भरपूर राग आला.त्यांने आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून विशालला फोन करून बोलवून घेतले. यानंतर विशालला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.यात विशाल गंभीर जखमी झाला.तर त्याला सोडविण्यासाठी पुढे आलेल्या गणेश औटे आणि उमेश मोरेलाही कृष्णाने मारहाण केली.यावेळी घरी आल्यानंतर विशाल जागेवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी आरोपी कृष्णा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami