कणकवली – मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावरून १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू होणार होती. तशी जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आली होती.मात्र आज प्रत्यक्षात ही टोल वसुली झालीच नाही.कुणीही टोल वसुली कर्मचारी टोल नाक्याकडे फिरकला नाही. संभाव्य आंदोलनाच्या भीतीमुळे ही टोल वसुली सुरू झाली नसल्याची चर्चा आहे.
जर ही टोल वसुली सुरू झाली असती तर टोल वसुली विरोधात जनआंदोलन होण्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. राजस्थानातील गणेशगढीया या कंपनीच्या माध्यमातून ही टोलवसुली केली जाणार आहे.काल मध्यरात्रीपासून ही टोल वसुली सुरू केली जाणार होती. मात्र आज दिवसभर कुठेही तशी हालचाल दिसून आली नाही. हा टोल वसुलीचे कंत्राट यशवंत मांजरेकर यांना देण्यात आले आहे.याआधी १ जून पासून ही टोल वसुली केली जाणार होती.मात्र त्यावेळी प्रखर राजकीय विरोधामुळे ते शक्य झाले नव्हते.मात्र असाही तीच शक्यता गृहीत धरल्याने निदान पहिल्या दिवशी टोल वसुली झाली नाही.या टोल वसुलीमध्ये सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आलेली नाही.फक्त ५० टक्के सवलत आहे.त्यांना ३०० रुपये महिना पास असणार आहे. पण त्याला स्थानिक जिल्हावासी नागरिकांचा विरोध आहे.
दरम्यान,टोल वसुलीचे नवे दर पुढीलप्रमाणे मोटार, जीप,व्हॅन आणि इतर हलकी वाहने -९० रुपये, मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने – १४५ रुपये, ट्रक आणि बस (२ ॲक्सल)- ३०५ रुपये व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी -३३५ रुपये मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी – ४८० रुपये ,सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी – ५८५ रुपये,अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्क असे असणार आहेत.