संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

ओयो हॉटेल्सचे संस्थापक
अडकणार लग्नाच्या बेडीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*पंतप्रधान मोदींना आमंत्रण

नवी दिल्ली : – ओयो हॉटेल्सचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या निमित्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले.
रितेश अग्रवाल यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल माहिती दिली. ट्वीटमध्ये लिहीले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आम्ही एका नवी सुरुवात करत आहोत. ज्या उत्साहाने त्यांनी आमचे स्वागत केले, त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही. उत्तर प्रदेशमधील त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाने माझी आई प्रेरित होऊन त्यांना भेटण्यास उत्सुक होती. तुमचा मौल्यवान वेळ आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.’ पुढच्या महिन्यात अग्रवाल विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर त्यांनी दिल्लीतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
ओयोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी २०१३ मध्ये ओयो रुम्सची भारतामध्ये स्थापना केली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये या कंपनीने मोठी प्रगती केली. कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी हॉस्पिटॅलिटी कंपनी म्हणून उदयास आली. अलीकडेच, अग्रवाल यांनी खुलासा केला की, ओयो हॉस्पिटॅलिटी चेन इंडोनेशियातील सर्वात मोठे हॉस्पिटॅलिटी टेक प्लॅटफॉर्म झाली आहे. १८० हून अधिक शहरांमध्ये २,५०० हून अधिक विशेष ओयो हॉटेल्स उपलब्ध आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या