संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

ओडिशात १७० वर्षे जुन्या लाकडी शिलालेखाचा शोध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुरी – ओडिशातील पुरी जिल्ह्यातील एका मंदिरात १७० वर्षे जुना लाकडी शिलालेख पुरातत्वशास्त्रज्ञांनी  शोधून काढला आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज च्या तीन सदस्यीय टीमला दया-रत्नचिरा नदीच्या खोऱ्यातील देलांग भागात पुरातत्व अवशेषांच्या सर्वेक्षणादरम्यान याचा शोध लागला.
इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज या संस्थेचे प्रकल्प समन्वयक अनिल धीर यांनी सांगितले की, खुर्दगडा किल्ल्याजवळील हरिराजपूर गावात असलेल्या पश्चिम सोमनाथ मंदिरात सुमारे १७० वर्षे जुना लाकडी शिलालेख सापडला आहे. भोई घराण्याची राजधानी असलेल्या ठिकाणी हे शिलालेख सापडले आहेत.समितीचे दोन सदस्य दीपक कुमार नायक आणि विक्रम नायक आहेत. दीपक यांनी सांगितले की, मंदिराच्या शिलालेखावर प्रभू रामाचाही संदर्भ आहे. काही वर्षांपूर्वी उत्कल विद्यापीठाच्या पथकाने येथे उत्खनन केले होते. तेव्हा दोन सांगाडे आणि पुरातत्व साहित्य सापडले होते. त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. या सापडलेल्या जुन्या अवशेषांवरून ही जागा फार पुरातन असल्याचे स्पष्ट होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami