भूवनेश्वर- ओडिशाच्या बलिया बाजारात भगवान कार्तिकेश्वर मुर्तीच्या विसर्जनाच्या वेळी फटाके फोडण्याच्या स्पर्धेत स्फोट झाल्याने बुधवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. या स्फोटमध्ये सुमारे 30 जण जखमी झाले.
केंद्रपाडा येथील सदर पोलीस ठाण्याच्या बलिया बाजारातस विसर्जन मिरवणुकीत अनेक लोक सहभागी झाले होते. येथे फटाके फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना फटाक्यांच्या ढिगाऱ्यावर ठिणगी पडल्याने स्फोट झाला. या स्फोटात 30 हून अधिक जण जखमी झाले. केंद्रपाडा जिल्हाधिकारी अमृत ऋतूराज यांनी सांगितले की, केंद्रपारा येथील सदर पोलीस स्टेशनच्या बलिया मार्केटमध्ये विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्फोटांमध्ये 30 हून अधिक लोक जखमी झाले. ते म्हणाले की, सर्व जखमींना केंद्रपारा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.