संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

ओडिशाचे मुख्यमंत्री १० वर्षांनंतर विदेश दौऱ्यावर?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भुवनेश्वर – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे 28 जून रोजी परदेश दौऱ्यावर जाणार, असे वृत्त आहे. पटनाईक संयुक्त अरब अमिराती आणि रोमला देशाच्या दौऱ्यावर जाणार, असे कळते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, हा दौरा झाल्यास नवीन पटनाईक यांचा हा जवळपास दशकभरानंतरचा परदेश दौरा असणार आहे.

पटनाईक यांनी २२ वर्षांच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री असताना देशाबाहेर जाणे टाळले. त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना परदेश दौऱ्याची परवानगी दिली. तसेच 2012 साली ते आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या निमंत्रणावर लंडनला गेले होते. मात्र त्यावेळी त्यांचे जवळचे सहकारी दिवंगत प्यारी मोहन महापात्रा यांनी केलेल्या कथित बंडानंतर त्यांना त्यांचा दौरा अर्धवट सोडावा लागता होता. मिळालेल्या माहितीनुसार, आता पटनाईक दुबईत राहणाऱ्या ओडिया (अनिवासी ओडिया) भाषिकांच्या सभेला संबोधित करणार आहेत. तसेच इंडस्ट्रियल प्रमोशन अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओडिशा लिमिटेड (IPICOL) आणि दुबई-स्थित भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याद्वारे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे (FICCI) आयोजित केलेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ते सहभागी होतील.

दरम्यान, ओडिशात गेली २२ वर्षे बिजू जनला दल सत्तेत आहे. बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांच्या लोकभिमुख कारभाराने विरोधकांना राज्यात फारसे स्थान नाही. गेल्या आठवड्यात राज्यातील एका विधानसभा पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाच्या उमेदवाराने साठ टक्क्यांवर मते मिळवत विक्रमी विजय मिळवला. तर, राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांनी असा मोठा विजय मिळवला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मंत्रिमंडळाची फेररचना केली. तब्बल २० मंत्री बदलले. २९ मे रोजी पटनाईक सरकारला त्यांच्या पाचव्या कालावधीतील तीन वर्षे पूर्ण झाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami