संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे मुंबईच्या समुद्रात लँडिंग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरची मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याची धक्कादायक घटना आज घडली. हेलिकॉप्टरमध्ये 2 क्रू पायलट आणि 7 प्रवासी होते. याबाबत भारतीय तटरक्षक दलाने ट्वीट करत सांगितले की, मुंबई पश्‍चिमेकडील सागर किरण ऑईल रिगजवळ ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले. आम्हाला हेलिकॉप्टरमधील नऊ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ओएनजीसी हेलिकॉप्टरने मुंबई समुद्राच्या पश्‍चिमेला 60 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या ऑईल रिग सागर किरणजवळ आपत्कालीन लँडिंग केली. याची माहिती मिळताच तटरक्षक दलाचे एक जहाज घटनास्थळी रवाना केले. यानंतर बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून दुसरे जहाज रवाना करण्यात आले. तटरक्षक दलाच्या विमानांनी समुद्रात लाईफ जॅकेट
खाली टाकले. तटरक्षक दल ओएनजीसीच्या संपर्कात होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami