संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

ऑस्ट्रेलियात पावसाचा कहर;
तीस हजारहून अधिक लोक बेघर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिडनी – ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि आजूबाजूच्या शहरात राहणाऱ्या ३०,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील धरणे तुडुंब भरली आणि नद्यांचे बंधारे तुटले, त्यामुळे शहरातील पन्नास लाख लोकांना दीड वर्षात चौथ्यांदा पूरासह आणीबाणीचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री मरे वॅट यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीचा पूर या भागात १८ महिन्यांपूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर असेल. त्यामुळे आजूबाजूच्या शहरातील लोकांना घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर डॉमिनिक पेरोट, राज्याचे पंतप्रधान वेल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ ३२,००० लोक यामुळे बेघर होण्याची भीती आहे.

ते म्हणाले की, आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समजते. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत सुरु असलेल्या बचावकार्यात यश आले असले तरी अजूनही शेकडो लोक पुरात अडकले असल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र ब्युरोचे व्यवस्थापक जेन गोल्डिंग यांनी सांगितले की, सिडनीच्या उत्तरेकडील न्यूकॅसल आणि सिडनीच्या दक्षिणेकडील वोलोंगॉन्गमधील काही भागात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पुराचा अधिकाधिक धोका व्यक्त केला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami