संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस डेव्हिडसनची हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पार्थ- ऑस्ट्रेलियातील सर्फिंग स्टार अशी ओळख असलेल्या क्रिस डेव्हिडसन याची एका पबच्या बाहेर हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, पर्थ सिटी पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.

ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सर्फिंग स्टार क्रिस डेव्हिडसन याचे सिडनीच्या उत्तरेतील एका पबच्या बाहेर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबच्या बाहेर क्रिसचे एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. क्रिस डेव्हिडसनला 1996 साली ऑस्ट्रेलियाच्या बेल्स बीच येथे वयाच्या 19व्या वर्षी रिप कर्ल प्रोमध्ये वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश मिळाला होता. यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याने सलग दोन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजेता
ठरला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami