संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

ऑस्कर विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचरचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉन्टदुरास – ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या १९७५ मधील चित्रपटात खलनायकी नर्सची भूमिका साकारणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. २३ सप्टेंबरला फ्रान्सच्या मॉन्टदुरास येथील घरात त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांचे एजंट डेव्हिड शॉल यांनी शुक्रवारी असोसिएटेड प्रेसला ही माहिती दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
लुईस यांच्या अनेक चित्रपटांमधील विविध भूमिका चाहत्यांच्या नेहमीच आठवणीत राहणाऱ्या आहेत. लुईस यांना दिग्दर्शक मिलोस फोरमन यांनी ‘कुकूज नेस्ट’मध्ये नर्सच्या भूमिकेसाठी कास्ट केले. तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. प्रेक्षकांसाठी त्यांचा चेहरा नवीन बनवला होता. १९३४ च्या ‘इट हॅपनड वन नाईट’ नंतरचा ‘वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट कथा जिंकणारा पहिला चित्रपट आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami