संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना हादरा! गणेशोत्सवात नोकरी गेली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात एसटीची सेवा सुरू ठेवून प्रवाशांना सेवा देणाऱ्या ८०० कंत्राटी बस चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. संपकरी सर्व कर्मचारी कामावर परतल्यामुळे महामंडळाने आज शनिवार ३ सप्टेंबरपासून त्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या चालकांचा वापर कमी होत असल्यामुळे त्यांची सेवा बंद केल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

सरकारी सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून संप पुकारला होता. त्यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. ती सुरळीत करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळाने टप्प्याटप्प्याने ८०० कंत्राटी बसचालकांची भर्ती केली होती. एप्रिलमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. आणि ते पुन्हा कामावर रुजू झाले. मात्र कंत्राटी चालकांना एसटीने मुदतवाढ दिली होती. २२ एप्रिलपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यानंतरही या कंत्राटी चालकांना अनेकदा मुदतवाढ दिली होती. मात्र त्यांचा फारसा वापर होत नसल्यामुळे एसटीने आजपासून त्यांची सेवा बंद केली आहे. त्याबाबतचा आदेश महामंडळाने शुक्रवारी काढला होता. परिणामी आजपासून कंत्राटी चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami