हैदराबाद:- हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीवरून अभविप आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. अभविपने असा आरोप आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांवर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थीनी हल्ला केला आहे. दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या राड्यात सात विद्यार्थी जखमी झाले आहेत.
अभविपचे सदस्य म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्याने निवडणुकीत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया मतदान केले नाही. या रागातून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण केली. या संदर्भात अभविपने ट्विट केले की, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने आदिवासी विद्यार्थीला मारहाण केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. अभविप सदस्य म्हणाले आमच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. दुसरीकडे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेच्या सदस्यांनी आरोप केला की, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे, हे अभाविपला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करून हिंसाचार भडकावला आहे.