संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

एलियन्सपासून मानव फक्त सात फूटावर असल्याचा नासाचा दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळावर राहणाऱ्या एलियन्सचा शोध लावला आहे. एलियन्सपासून मानव फक्त ७ फूट दूर असल्याचे नासाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, पृथ्वीवर राहणार्‍या आपण मानवांनी नेहमीच इतर जगात राहणाऱ्या प्राण्यांची कल्पना केली आहे.आतापर्यंत अनेकांनी एलियन्स असल्याचा दावा केला. काहीजणांनी एलियन्सचे फोटो टिपल्याचेही असे दावे नक्कीच झाले आहेत पण या दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. मात्र आता नासाने संपूर्ण जगाला एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. मंगळावरील एलियनपासून ते केवळ ७ फूट अंतरावर असल्याचे नासाने म्हटले आहे.मंगळावर एलियन राहत असल्याचा दावा नासाने केला आहे. मंगळावर जीवसृष्टीच्या शोधात पाठवण्यात आलेल्या मार्स रोव्हर्सना अशी माहिती मिळाली आहे की, मंगळावर सात फुटांपर्यंत उत्खनन केल्यास एलियनचे पुरावे मिळू शकतील, यासाठी प्रोटिन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲमिनो ॲसिडची यासाठी मदत घेतली जाणार आहे. त्याच्या मदतीने सात फुटांचं खोदकाम पूर्ण झाल्यावर हे प्रोटिन सापडतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या प्रोटिनचं पृथक्करण करून मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा अंदाज घेता येईल आणि त्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकणार आहे. आतापर्यंत या रोव्हरने ६ फूट खोदकाम पूर्ण केलं आहे आणि अजून एक फूट खोदकाम बाकी आहे.

मंगळ ग्रहावर पाणी सापडल्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. जर जीवसृष्टी असेल, तर ती नेमक्या कुठल्या स्वरुपाची आहे, याबाबत शास्त्रज्ञांना उत्सुकता आहे. नेमके कुठले प्राणी त्या ग्रहावर असतील, त्यांची बौद्धिक क्षमता कशी असेल, मानवाप्रमाणं उत्क्रांती झालेला एखादा प्राणी तिथे असेल का, जीवसृष्टीचा शोध लागल्यावर पुढे काय होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रयोगाच्या यशापयशावर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे सध्या सर्व विज्ञानप्रेमींचं लक्ष या खोदकामाकडे लागलं आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि मंगळावर एलियन्स असण्याची शक्यता आहे की नाही, याचं उत्तर मिळण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami