न्यूयॉर्क: ट्विटर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादीतील अव्वल स्थान गमावले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनची मूळ कंपनीचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड अरनॉल्ट यांचे कुटुंब आता संपत्तीच्या बाबतीत मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत बनले आहे.
अरनॉल्ट कुटुंब 185.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान झाले असून 2022 मध्ये एलन मस्कच्या एकूण संपत्तीत 200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात मस्कने ट्विटर खरेदी केल्याची घोषणा केल्यापासून टेस्लाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. मस्कने ऑक्टोबर 2022 मध्ये 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केला होता.मस्क यांनी सप्टेंबर 2021 पासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकून त्यांनी मानाचे स्थान मिळवले. मस्कच्या निव्वळ संपत्तीत मोठी घट टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आणि 44 अब्ज डॉलरच्या ट्विटर खरेदीमुळे झाली. बर्नार्ड अरनॉल्ट 185.3 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, पण लक्षात घ्या की मस्कची एकूण वैयक्तिक संपत्ती 185.7 अब्ज डॉलर आहे.