संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

एम्समध्ये लालूंना गीता पठण करण्यास रोखल्याने तेज प्रताप यादव नाराज

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीच्या एम्समध्ये दाखल असलेले राजद प्रमुख लालू यादव यांना गीता पठण आणि ऐकण्यापासून रोखल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर त्यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तेज प्रताप यादव यांनी आरोप केला की, वडिलांना रुग्णालयात श्रीमद भगवत गीता वाचायला आणि ऐकायला थांबवण्यात आले होते, तर वडिलांना गीता वाचायला आणि ऐकायला आवडते. जो अज्ञानी त्यांना गीता वाचण्यापासून थांबवतो त्याला या जन्मातच या महापापाची किंमत चुकवावी लागेल हे माहीत नाही. तेज प्रताप यादव यांनी यापूर्वी वडिलांबद्दल एक भावनिक ट्विट केले होते. ते म्हणाले होते, ‘बाबा, लवकर बरे व्हा आणि घरी या, तुम्ही आहात तर सर्व काही आहे, प्रभु, जोपर्यंत वडील घरी येत नाहीत, तोपर्यंत मी तुझ्या आश्रयाला आहे. मला फक्त बाबा हवे आहेत आणि काहीही नाही, राजकारण नाही आणि दुसरे काही नाही, फक्त माझे बाबा आणि फक्त बाबा.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami