संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

एका दिवसात देशात ८,३२९ तर
महाराष्ट्रात ३,०८१ कोरोनाचे नवे रुग्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशात कोरोनाची पुन्हा रुग्ण वाढ सुरू झाली आहे. त्यात एका दिवसात देशात ८,३२९ तर महाराष्ट्रात ३,०८१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. ओमिक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. एका दिवसात कोरोनाने १० जणांचा बळी घेतला. गुरुवारी ७ हजार ५८४ नवे रुग्ण सापडले होते आणि २४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र शुक्रवारी एका दिवसात त्यात ९.८ टक्के वाढ झाली.
शुक्रवारी २४ तासांत देशभरात कोरोनाचे ८,३२९ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी ३२ लाख १३ हजार ४३५ झाली. दिवसभरात १० जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या ५ लाख २४ हजार ७५७ झाली. हा मृत्युदर १.२१ टक्के आहे. देशात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४० हजार ३७० आहे. दिवसभरात ४,२१६ जणांनी कोरोनावर मात केली. देशातील कोरोनाचा पॉझिटिव्ह दर ०.८४ टक्के आहे. आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ४८ हजार ३०८ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशाचा रिकवरी रेट ९८.६९ टक्के आहे. ५ राज्यांमध्ये कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. त्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एका दिवसात ३,०८१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. मात्र दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. महाराष्ट्रात १,३२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३,३२९ आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या केरळमध्ये २,४१५, दिल्लीत ६५५, कर्नाटकात ५२५ आणि हरियाणात ३२७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे १,९५६ नवे रुग्ण सापडले. तर एका दिवसात ७६३ जणांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९,१९१ आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami