संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

ऋषिकेश – बद्रीनाथ मार्गावर अपघात! मुंबईतल्या ४ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ऋषिकेश – उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश- बद्रीनाथ मार्गावरील ब्रह्मपुरीजवळ एक कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मुंबईतील ४ भाविकांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये कार चालकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाच भाविक काल शुक्रवारी सकाळी बद्रीनाथ धाम दर्शनासाठी चालले होते. त्यावेळी त्यांची अटिर्गा कार ब्रह्मपुरीच्या श्रीराम तपस्थळी आश्रमाजवळ आल्यानंतर अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट खोल दरीत कोसळली.
हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमी भाविकाचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.अन्य दोघांवर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातातील मृतांची नावे शिवाजी बुधकर(५३) रा. दहिसर, पुरुषोत्तम दत्तात्रेय खिलकुटी (३७) रा.वसई कोळीवाडा,जितेश प्रकाश लोखंडे (४३)रा.मनोर,आणि धर्मराज नारायण पुत्र रा. पाचूबंदर ,वसई अशी आहेत. तर जखमींमध्ये रवींद्र महादेव चव्हाण रा.मुंबई आणि रुद्रप्रयाग येथील चालक कवींद्र सिंह यांचा समावेश आहे.कार चालक रविंद्र सिंह याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आहे,अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मुनीचे रेती रितेश शाह यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami