संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

उरणच्या समुद्रात आढळली विनानंबरची संशयास्पद बोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड- रायगडमधील उरणच्या करंजाजवळील समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली आहे.ही बोट मासेमारीची असून ती विनानंबरची असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.रविवारी रात्री ही बोट आढळल्याचे सांगितले जात आहे.रात्रीच्या वेळी खाडी परिसरात अधिकारी गस्त घालत असताना त्यांना ही बोट आढळून आली.ही बोट उरण पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

या बोटीला नंबरप्लेट नसल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्यांनी रेवस आणि करंजादरम्यान या बोटीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी ही बोट ताब्यात घेऊन उरणच्या बंदरात आणली.यावेळी बोटीवरील कर्मचार्‍याला विचारणा केली असता तो निरुत्तर झाला.मात्र प्राथमिक माहितीनुसार, या बोटीत डिझेल आढळून आले असून ही बोट मुंबईतील एका व्यक्तीची असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे डिझेल चोरीसाठी ही बोट वापरत असल्याचा संशय आहे. तथापि,घातपातासाठी या बोटीचा वापर झाला का, याबाबतही तपास सुरू आहे.

दरम्यान, महिनाभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी २ संशयास्पद बोटी आढळल्या होत्या.यानंतर जिल्ह्यात लगेच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. एका बोटीत एके-४७ रायफल्स व स्फोटके सापडले होती. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत विधिमंडळाच्या सभागृहात माहिती दिली होती. फडणवीस म्हणाले होते की, रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली.त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली.बोटीमध्ये ३ ए.के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. दरम्यान,उरणच्या करंजा बंदरात बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले असल्याची माहिती परवाना अधिकारी सुरेश बहूलगवे यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami