संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

उमेश कोल्हे हत्त्येतील फरारी शमीमसाठी २ लाखांचे बक्षीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या खून प्रकरणातील फरारी आरोपी शमीम अहमद उर्फ फिरोज अहमद याची माहिती देणाऱ्यासाठी २ लाखांचे बक्षीस एनआयएने जाहीर केले आहे. २१ जूनला उमेशची त्याच्या घराजवळ चाकूने भोसकून हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक झाली आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माचे उमेश कोल्हेने सोशल मीडियावर समर्थन केले होते. त्यानंतर २१ जूनला उमेशची त्याच्या घराजवळ चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याचा संशय होता. मात्र नंतर नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे ही घटना घडल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मुदस्सर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद आणि डॉ. युसूफ खान यांना एनआयएने अटक केली आहे. मात्र यातील शमीम अहमद फरार आहे. त्यामुळे त्याची माहिती देणारास एनआयएने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami