संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

उमा भारती यांच्या लोधी समाजाकडून मध्य प्रदेशात ब्राह्मणांवर बहिष्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ – मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमत्री उमा भारती यांच्या लोधी या ओबीसी वर्गातील समाजाने ब्राम्हण समाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोधी समाजाने शिवपुरी जिल्ह्यात ब्राम्हणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून आता याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.लोधी समाजाच्या या निर्णयामुळे पुढील वर्षातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा अडचणीत आला आहे.
लोधी समाजातील मोठे नेते प्रीतम लोधी यांनी काही दिवसांपूर्वी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपनेभाजप ब्राम्हण समाजाला खूष करण्यासाठी प्रीतम लोधी यांना पक्षातून निलंबित केले होते.मात्र भाजपचा हा निर्णय त्यांच्याच पक्षाला घातक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.लोधी समाजाने असा निर्णय घेतला आहे की,यापुढे घरातील कोणत्याही कर्मकांड किंवा पूजेसाठी ब्राम्हणाला पाचारण करायचे नाही.तसेच गावातील ग्रामपंचायतीनी तर या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास चक्क पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवपुरी जिल्ह्यात लोधी समाजाच्या अशा नव्या फतव्याबाबत अनेकांच्या सहीसहित पत्रकेही वाटण्यात आली आहेत.प्रीतम लोधी यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर काही भाजप समर्थकांनी कथा,पूजा आणि कीर्तनातून त्यांच्या विरोधात बोलले गेले होते.लोधी समाजाने काढलेले हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.या पत्रकावर तारीख जरी जुनी असली तरी निर्णय हा २३ ऑगस्ट रोजी घेतला आहे.काही गावात तर हा निर्णय पंचांसमोर घेतला आहे.काही दिवसांपूर्वी तर भिंड जिल्ह्यात प्रीतम सिंह यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात आला होता.पुढील वर्षी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत.त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण हा समाज भाजपचा मतदार आहे.उमा भारती याच समाजातील आहेत. त्यामुळे लोधी समाजाला दुखावणे भाजपला परवडणारे ठरणार नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami