संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

उपवास करणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी; तज्ज्ञांचे निरीक्षण

virus, omicron, corona-6856139.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – उपवासामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे म्हटले जाते. मात्र आता नियमितपणे उपवास करणाऱ्यांना कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका तुलनेने कमी असतो, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. बीएमजे न्यूट्रिशन, प्रीव्हेन्शन अँड हेल्थ या साप्ताहिकात हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. जे कोरोना रुग्ण नियमितपणे केवळ पाणी पिऊन उपवास करतात, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा किंवा मृत्यूचा धोका उपवास न करणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे. परंतु उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उपवास हा कोरोना लसीकरणाचा पर्याय नाही, असेही यात स्पष्टपणे सांगितलेले आहे.

या अभ्यासामध्ये मार्च २०२० आणि फेब्रुवारी २०२१ या काळात जेव्हा लस उपलब्ध नव्हती, तेव्हा कोरोना झालेल्या २०५ जणांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी ७३ जण महिन्यातून किमान एकदा नियमितपणे उपवास करतात. या लोकांचे रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडण्याचे प्रमाण किंवा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. कारण १२ ते १४ तास उपवास केल्यानंतर शरीर ग्लुकोजऐवजी रक्तातील कीटोन आणि लिनोलेक ऍसिड वापरू लागते. कोरोनाच्या पृष्ठभागावर असलेल्या एका खाचेमध्ये हे लिनोलेक ऍसिड चिकटून बसते ज्यामुळे हा विषाणू इतर पेशींना चिकटत नाही.

अमेरिकेतील संशोधक बेंजामिन होर्ने यांनी सांगितले की, आम्ही उपवासाचे आणखी फायदे काय आहेत याचा शोध घेत आहोत. जे लोक अनेक दशकांपासून उपवास करत आहेत, त्यांना काय फायदे होतात, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami