नागपूर – यंदाचे हिवाळी अधिवेशन प्रथेप्रमाणे येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहेत.मंत्र्यांचे बंगले अधिवेशनासाठी सज्ज आणि टापटीप करण्याचे काम सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर तर सुरक्षेसाठी १० फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
वास्तविकता,हिवाळी अधिवेशन नेहमीच वादळी ठरत आले आहे.कोरोनामुळे दोन वर्षांच्या विश्रांती नंतर होणाऱ्या यंदाच्या अधिवेशनाबाबत उत्सुकता आहे.व्हीआयपींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.पोलीसांच्या सूचनेनुसार नागपूरातील देवगिरी बंगल्याला १० फूट उंच आणि एक फूट रुंद सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे.सुरक्षा भिंतीवर काटेरी तार लावण्याच्या पोलिसांच्या सूचना आहेत.विशेष म्हणजे पहिल्यांदाच देवगिरी बंगल्याला इतकी मोठी सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात झाली आहे.