मुंबई – उद्धव ठाकरे ३ डिसेंबरला पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यावेळी ते बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. संघटनेची ताकद वाढवण्यासाठी आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुखांना ताकद देण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत. हा दौरा त्याचाच एक भाग आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबुतीवर भर दिला आहे. त्यात त्यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ३ डिसेंबरला ते पोहरादेवीला जाणार आहेत. त्यावेळी बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. यवतमाळमध्ये कॅबिनेट मंत्री राठोड यांच्या विरोधात संजय देशमुखांना ते ताकद देणार आहेत. बुलढाना आणि यवतमाळचाही दौरा ते करणार आहेत.