संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

उद्धव ठाकरेसमोर असताना बंड्या साळवींना शिंदेंचा आला फोन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मातोश्रीवर संघटनात्मक विषयावर चर्चा सुरू असताना कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक विजय उर्फ बंड्या साळवींना एकनाथ शिंदे यांचा अचानक फोन आला. उध्दव ठाकरे आणि साळवींची नजरानजर झाली. ठाकरेंनी फोन कोणाचा ते ओळखले. ‘तुमच्या बोलण्यात माझा अडसर नको. तुम्हाला बोलताना कोंडल्यासारखे वाटू नये म्हणून थोडा वेळ बाजूच्या खोलीत जातो. तुम्ही दिलखुलास बोला, असे साळवींना सांगून उध्दव ठाकरे बाजुच्या दालनात गेले.

एकनाथ शिंदेंनी आपण घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेसंदर्भात विजय साळवी यांना विचारणा केली. त्यावेळी साळवींनी आपण मातोश्रीमध्ये बसलो आहोत हे दाखवून न देता आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत.लहानपणापासून ज्या संघटनेते वाढलो. ज्या संघटनेने मोठे केले ती संघटना सोडण्याचा विचार मनात येऊ शकत नाही, असे शिंदे यांना सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी ‘मीही शिवसेनेतच आहे, असे म्हटले. त्यावेळी साळवी यांनी उव्दिग्न होऊन ‘शिंदे साहेब आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत. आपले चुकलेच आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, असे शिंदे यांना सुनावले. हे संभाषण संपल्यानंतर बाजुच्या दालनात असलेले पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुन्हा साळवी बसलेल्या दालनात येऊन बसले. त्यावेळी शिंदे काय बोलले याविषयी चकार शब्द न विचारता ठाकरे यांनी पुन्हा संघटनात्मक बांधणी, यापुढील काळातील पक्षाची रणनीती विषयावर साळवी यांच्यासह तेथे जमलेल्या सेना पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami