लखनऊ – उत्तर प्रदेशच्या बाराबंकीतील सुमली नदीत भाविकांची बोट उलटून दुर्घटना घडली. त्यात ३० भाविक बुडाले. मात्र त्यातील २० जणांना सुखरूप वाचवले असून ७ जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेत ३ मुलांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण जत्रेला जात होते.
बाराबंकी जिल्ह्यातील बैराणा माळ माझरी गावात यात्रा आणि जंगी कुस्त्यांची स्पर्धा होती. त्यासाठी काही भाविक आणि कुस्तीप्रेमी सुमली नदीतून बोटीने पलीकडे जात होते. त्यावेळी समतोल बिघडल्यामुळे बोट नदीत उलटून दुर्घटना घडली. त्यात बोटीतील ३० जण नदीच्या पाण्यात बुडाले. त्यातील २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बुडालेल्या ७ जणांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बोट दुर्घटनेत ३ मुलांचा बुडून मृत्यू झाला.