संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

उत्तर प्रदेशच्या साहरनपूरमध्ये कबड्डी संघाला बाथरूममध्ये जेवण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

साहरनपूर:- यूपीच्या सहारनपूरमध्ये कबड्डी स्पर्धेत आलेल्या खेळाडूंना बाथरूममध्ये जेवण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाथरूममध्ये जेवणही तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत 200 हून अधिक खेळाडू आले होते. बाथरूममध्ये अन्न वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहारनपूरचे क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

खेळाडूंना कच्चा भात देण्यात आला होता, अनेक खेळाडूंनी खाण्यास नकार दिला. खेळाडूंनी हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शुट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलीस चौकशी करणार आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे. खेळाडूंना अशी निकृष्ट दर्जाची सेवा दिली गेल्यामुळे राज्या सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे.

सहारनपूर येथील डॉ भीमराव स्पोर्ट्स स्टेडियमवर सब ज्युनियर (मुली) कबड्डी स्पर्धेचा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत चालली, ज्यामध्ये 17 संघांनी सहभाग घेतला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami