संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

उत्तराखंड हिमस्खलनात २ शिकाऊ गिर्यारोहकांचा मृत्यू! २८ जण अडकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून – केदारनाथनंतर उत्तराखंडच्या उत्तरकाशीत हिमस्खलनामुळे पर्वतारोहणाचे प्रशिक्षण घेणारे २ प्रशिक्षणार्थी ठार झाले असून २८ जण बर्फाच्या डोंगरावर अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग उत्तरकाशीचे हे प्रशिक्षणार्थी द्रौपदी दांडा-२ पर्वतावर गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

हिमस्खलनामुळे बर्फाच्या डोंगरावर अडकलेल्या प्रशिक्षणार्थींच्या सुटकेसाठी डेहराडून येथून एसडीआरएफची टीम रवाना झाली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संपर्क साधून बचाव कार्याला गती देण्यासाठी मदतीची मागणी केली. मुख्यमंत्री धामी यांनी अडकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी लष्कराच्या मदतीची मागणी केली असून केंद्र सरकारने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांना दिले आहे. अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीचे जवान मदत आणि बचाव कार्य राबवत आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami