डेहराडून – उत्तराखंडची राजधानी डेहराडूनसह उत्तरकाशी, बडकोट, टिहरी आणि मसुरी या भागाला आज सकाळी भूकंपाचे हादरे बसले. सकाळी ८.३३ च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल होती. उत्तरकाशीच्या चिन्यालीसौडपासून ३५ किलोमीटर दूर त्याचा केंद्रबिंदू होता. भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
उत्तराखंडच्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. डेहराडून, उत्तरकाशी, बडकोट, टिहरी आणि मसूरी या भागात भूकंप झाला. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरकाशीपासून ३५ किलोमीटरवर जमीनीखाली ५ किलोमीटर खोल होता. यापूर्वी २ ऑक्टोबरला येथे भूकंप झाला होता. या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, असे टिहरी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने सांगितले.