संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

उत्तराखंड काँग्रेसमध्ये उभी फूट; ३ बड्या नेत्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – गोवा काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चर्चा सुरू असतानाच उत्तराखंड काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काँग्रेसच्या ३ बड्या नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. उत्तराखंड काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रतूडी, प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा कमलेश रमण आणि काँग्रेसचे सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांनी आपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील कार्यालयात सोमवारी पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळली होती. अनेक नेत्यांनी राजीनामे दिले होते. आता काँग्रेसच्या ३ ज्येष्ठ नेत्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उत्तराखंडमध्ये आप आणखी भक्कम होईल, असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला. उत्तराखंडमधील आपचे संयोजक जोत सिंह बिष्ट यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरक सिंग रावत यांच्या घरी नेत्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस हरीश रावत या बैठकीपासून दूर होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami