पिथोरगड – उत्तराखंडातील पिथोरगड येथे भारत-नेपाळ सीमेवर रविवारी तणाव निर्माण झाला.सायंकाळी भारतीय मजुरांवर नेपाळच्या बाजूने दगडफेक करण्यात आली.अचानक झालेल्या या प्रकाराने येथे गोंधळ माजला.विशेष म्हणजे नेपाळचे सुरक्षारक्षकांनी यावर काहीही कारवाई केली नाही,ते घडत असलेला प्रकार फक्त बघत राहिले.
धारचुला भागात ही घटना घडली.धारचुला भागातील काली नदीवर भारताकडून तटबंदी घालण्याचे काम सुरू आहे.त्याला काही नेपाळी नागरिकांचा विरोध आहे. हा बांध बांधतानाच्या कामात यापुर्वीही नेपाळकडून वारंवार दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.धारचुला हा नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमावर्ती भाग आहे.नेपाळची सीमा धारचुला येथून सुरू होते. धारचुला येथे काली नदीच्या एका काठावर नेपाळ आहे तर दुसऱ्या काठावर नेपाळ आहे. काली नदीच्या आजुबाजूला शेकडो गावे आहेत.या गावांमध्ये येण्याजाण्यासाठी अनेक सस्पेन्शन ब्रिज बनवले गेले आङेत.भारत नेपाळ सीमेवर एसएसबीला तैनातही केले आहे.
भारत स्वतःच्या मालकीच्या भागात तटबंदी बांधत आहे. तरीदेखील नेपाळकडून या कामाला वारंवार विरोध केला जात आहे. दगडफेकीचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे भारताच्या हद्दीत या प्रकारांबाबत नाराजी आहे.भारताच्या तटबंदीमुळे नेपाळला नदीच्या पाण्याचा धोका होईल,असे नेपाळमधील लोकांचे म्हणणे आहे.