संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

उत्तराखंडमध्ये भरती परीक्षेत
कॉपी केल्यास जन्मठेप शिक्षा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून – उत्तराखंड राज्यामध्ये आता स्पर्धात्मक भरती परीक्षांमध्ये केली जाणारी फसवणूक रोखण्यासाठी देशातील सर्वांत कडक कायदा मंजूर करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये भरती परीक्षांमध्ये पेपर फोडल्यास किंवा कॉपी केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यास आता जास्तीत जास्त जन्मठेप शिक्षा होऊ शकते. तसेच १० कोटी रुपयांचा दंडही आकारला जावू शकतो.

हा कायदा इतका कडक असणार आहे की अशा प्रकरणातून मिळवलेली संबंधित व्यक्तीची मालमत्ताही जप्त केली जाणार आहे.हा कॉपी विरोधी कायदा सर्व स्पर्धा परीक्षांना लागु असणार आहे.यासंदर्भात उत्तराखंड सरकारने हा स्पर्धा परीक्षा अध्यादेश २०२३ राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता.राज्यपालांनी २४ तासांच्या आत या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे.हा कायदा देशातील सर्वांत कायदा असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन कॉपी विरोधी कायद्यांतर्गत उमेदवार भरती परीक्षेत स्वत: नक्कल करताना किंवा दुसऱ्याला नक्कल करायला मदत केल्याचे आढळल्यास, अशा प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.तसेच किमान पाच लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हा उमेदवार पुन्हा इतर स्पर्धा परीक्षेत दोषी आढळल्यास त्याला किमान १० वर्षे कारावास आणि किमान १० लाख रुपये दंड भरावा लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या