संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने चारधाम यात्रेचे भाविक अडकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून – उत्तराखंडच्या चमोलीत शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे दरडी कोसळली. त्यामुळे बद्रीनाथ हायवेवरील वाहतूक बंद पडली आहे. या दुर्घटनेमुळे चारधाम यात्रेचे अनेक भाविक रस्त्यात आणि इतर ठिकाणी अडकून पडले आहेत. रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

यंदा ८ मेपासून चारधाम भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. त्यात आतापर्यंत ७ लाख ६० हजार भाविकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले, अशी माहिती बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने दिली. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री उशिरा चमोलीत दरड कोसळली, त्यातील दगड व माती महामार्गावर आल्यामुळे बद्रीनाथ हायवेवरील वाहतूक बंद पडली. यामुळे अनेक भाविक रस्त्यात मध्येच अडकून पडले आहेत. काहीजण हॉटेल आणि लॉजमध्ये अडकले आहेत. महामार्गावर कोसळलेली दरडी हटवण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे त्यात अडथळे येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami