मुंबई, मुंबईतील एका शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या उत्तराखंड राज्यातील दोन युवक तनुज मेहता अणि सौरभ स्वार यांच्यासमवेत असणाऱ्या इतर चौदा भारतीय अणि इतर सहकाऱ्यांना आफ्रिकेतील गिनी देशाच्या नौसेनाने ताब्यात घेतले आहे. चौदा ऑगस्टपासून या सर्व भारतीयांना गिनीने कैदेत ठेवले आहे.
या बाबत सौरभ स्वार अणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पंतप्रधान कार्यालय अणि आपल्या कंपनीकडे मदतीची हाक मारली आहे.
आठ ऑगस्ट रोजी हे लोक आपल्या कंपनीच्या जहाजाने कच्चे तेल भरण्यासाठी नायजेरिया देशातील एकेपीओ टर्मिनल येथे पोहोचले होते. त्यावेळी जहाज गिनी देशाच्या समुद्र हद्दीत पोहोचले असता नायजेरियाच्या इशाऱ्याने गिनी नौसेना ने जहाजातील सर्व लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौदा ऑगस्टपासून हे लोक गिनीच्या ताब्यात असल्याने त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखात आहेत. विविध पातळ्यांवर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.