संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

उजैनमध्ये बिगर हिंदू म्हणून गरब्यात युवकांना मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उजैन – मध्यप्रदेशातील उजैन शहरातील कालिदास अकादमीने आयोजित केलेल्या नवरात्रीनिमित्तच्या गरबा कार्यक्रमात आलेल्या तीन मुस्लिम युवकांना बिगर हिंदू आहे म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या युवकांना बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

कालिदास अकादमीमध्ये काल शनिवारी रात्री नवरंग दांडिया कार्यक्रम सुरु होता.त्यावेळी त्या ठिकाणी तीन मुस्लिम तरुण फिरत होते.त्यावेळी तेथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले,त्यावेळी त्यांनी आपण मुस्लिम असल्याचे सांगितले.त्याचक्षणी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली.या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.त्यानंतर त्या युवकांना पकडून माधव नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.विशेष म्हणजे याठिकाणच्या गरबा कार्यक्रमात मुस्लिम समाजातील युवकांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.तरीही हे युवक गरब्याच्या ठिकाणी आले होते.काही मुस्लिम तरुण बंदी असतानाही गरब्यात सहभागी होऊन मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.काही दिवसांपूर्वी इंदूर येथील गरबा कार्यक्रमातही अशा छेड काढणाऱ्या तरुणांना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून त्यांना बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami