संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

ईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संंजय राऊत आज ईडी कार्यालयात गैरहजर राहिले. त्यांच्या वकिलाने कार्यालयात हजेरी लावत राऊतांच्या चौकशीबाबत 14 दिवसांची मुदतवाढ मागितली. त्यानंतर ही मागणी ईडीच्या अधिकार्‍यांनी मान्य केली.

काल संंजय राऊतांना ईडीने आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर राऊत म्हणाले होते की, माझा मंगळवारी अलिबागचा दौरा आहे. त्यामुळे मी चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. माझे वकील ईडी कार्यालयात जातील आणि ईडीच्या अधिकार्‍यांना पत्र देतील. त्यानुसार आज सकाळी त्यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ईडी अधिकार्‍यांना पत्र दिले. चौकशीबाबत 14 दिवसांची मुदतवाढ मागितली. ही मुदतवाढ ईडीच्या अधिकार्‍यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami