संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

ईडीकडून मुंबईत झवेरी बाजारात छापे! ९२ किलो सोने, ३३० किलो चांदी जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : इडीने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईतील झवेरी सराफ व्यापाऱ्यांच्या बाजारात चार छापे टाकले आहेत. . यात सराफ व्यापाऱ्याकडून ९२ किलो सोने आणि ३३० किलो चांदी जप्त केली. ही कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती इडीकडून देण्यात आली आहे.

मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवले्. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. इडीला शोध कारवाईदरम्यान मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचं इडीला आढळून आलं. कोणतेही केवायसी न पाळता तसंच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं, कोणतंही रजिस्टर नसल्याचं इडीला आढळून आलं आहे.लॉकर परिसराची झडती घेतली असता ७६१ लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये ९२ किलो सोने आणि १५२ किलो चांदी सापडली. २ लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यात अतिरिक्त १८८ किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४७.७६कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami