संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

इस्लामाबाद आणि परिसर भूकंपाने हादरला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज 4.5 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरली. इस्लामाबादमधील नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कोह-ए-हिंदुकुश पर्वताखाली 130 किलोमीटर भूगर्भात होता. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, इस्लामाबादसह मुलतान, भाकर, फालिया, पेशावर, मलाकंद, स्वात, मियांवली, पाकपट्टन आणि बुनेरसह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 23 जूनच्या सकाळी 8.56 वाजता पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या कलाफगनपासून 58 किलोमीटर अंतरावर होता. तर, 2 जून रोजी दुपारी इस्लामाबादमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू इस्लामाबादच्या वायव्येस 198 किलोमीटर
अंतरावर होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami