संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

इस्रोची देशाला अशीही दिवाळी भेट! सर्वात वजनदार रॉकेटचे प्रक्षेपण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीहरीकोटा – दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे. इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. वनवेबच्या ३६ रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, इस्रोने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘ एलव्हीएम-३’ म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क ३ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री १२.०७ वाजता प्रक्षेपित केले.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रोच्या रॉकेट एलव्हीएम-३ ने एका खाजगी कम्युनिकेशन फर्म वनवेबचे ३६ उपग्रह वाहून नेले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एलव्हीएम-३ द्वारे ३६ वनवेब उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल. ३६ पैकी १६ उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले असून उर्वरित २० उपग्रह वेगळे केले जातील.१०८ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार ब्रिटनसोबत झालेल्या १०८ उपग्रह करारांतर्गत जीएसएलव्ही मार्क-३ पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले.३६ उपग्रह निव्वळ दळणवळणासाठी आहेत. या वर्षी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही रॉकेटची चाचणी घेण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने यापूर्वी भारती-समर्थित वनवेब या लो अर्थ ऑर्बिट उपग्रह संप्रेषण कंपनीसोबत दोन प्रक्षेपण सेवा करारांवर स्वाक्षरी केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami