संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

इस्रायलकडून सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह एअरपोर्टवर हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या ६ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. दुसरीकडे इस्रायल आणि इराणमध्येही युद्धजन्य परिस्थिती पहायला मिळत असताना, काल रात्री इस्रायलने सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्टवर हवाई हल्ला केल्याचा आरोप सीरियाने केला आहे. इस्रायलने घातक मिसाईल आणि शस्त्रास्त्रांच्या मदतीने इराण विमानतळांना लक्ष्य केल्याचा आरोप सीरियाने केला आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिला हल्ला करण्यात आला. तर दुसरा हल्ला राजधानी दमस्कसजवळ करण्यात आला. सोशल मीडियावरील अनेक फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी फायरिंग झाल्याची माहिती मिळत आहे. सीरियाच्या स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, इस्रायलने तासाभरात दोन विमानतळांवर हवाई हल्ला केला, यावेळी इराणचे विमान उतरू नये यासाठी इस्रायलने अलेप्पो विमानतळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्याच्यावेळी विमानतळावर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय होते. त्यामुळे क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान सीरियात हवाई हल्ला करण्यापूर्वी इस्त्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी अमेरिकेचे राष्ट्राधयक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
सीरियन अरब न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, दमास्कसच्या ग्रामीण भागांत इस्रायली हल्ल्यांचा सामना करताना सीरियाने हवाई संरक्षणासाठी अनेक क्षेपणास्त्रे डागली. स्थानिक वेळेनुसार, रात्री ९.१५च्या सुमारास इस्रायलने उत्तर व्याप्त पॅलेस्टाईनमधील लेट टिबेरियासच्या दिशेने हल्ला केला आणि दमास्कसच्या आग्नेयेकडील काही ठिकाणांनाही लक्ष्य केले, इस्रायलच्या लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास इस्रायलने अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला, इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचं नुकसान झालं असलं तरी कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान यापूर्वी इस्रायलने दुसऱ्यांदा सीरियावर हवाई हल्ला केला. यापूर्वी इस्त्रायलनं अलेप्पोच्या नैऋत्येकडील मस्याफ येथील सीरियन सायंटिफिक स्टडीज अँड रिसर्च सेंटरवर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले,तर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले, गेल्या काही वर्षांत अलेप्पोजवळ इस्रायलने अनेक हवाई हल्ले केले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami