तेहरान- हिजाबविरोधात आज पुन्हा इराणी विद्यापीठातील संप्तत विद्यार्थ्यांचे आंदोलन जमिनीवर बसून जोरदार आंदोलन केले. त्यांनी त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर पोस्टर घरुन सरकारविरोधात जोरदार घोषणा दिली. हिजाबविरोधात गेल्या कित्येक दिवसांपासून इराणी महिलासंह विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच असल्याने तेथे तणावाचे वातावरण आहे.
आंदोलकांनी सांगितले की, ‘हिजाब सक्ती बंद होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहिल. आमचा आवाज दाबण्याचा कोणीच प्रयत्न करु नये आम्ही गप्प बसणार नाही,. दरम्यान, 22 वर्षीय महसा अमिनी 13 सप्टेंबर रोजी कुर्दिस्तानहून इराणची राजधानी तेहरानला तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पोहोचली होती. महसा अमिनीच्या डोक्यावर हिजाब होता, पण इराणच्या कायद्यानुसार तो योग्य नव्हता, कारण त्यातून महसा अमिनीचे केस दिसत होते. यानंतर इराणच्या मॉरल पोलिसांनी महसाला सोबत घेतले. महसाला हृदयविकाराचा झटका आला होता. महसा कोमात गेली आणि 16 सप्टेंबर रोजी तिच्या मृत्यूची बातमी आली.