तेहरान – इराणच्या पश्चिमेतील शहर इजीह येथील सेंट्रल बाजारात बुधवारी रात्री २ अज्ञात हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला. त्यात ५ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्याचे कारण समजलेले नाही. गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे इराण हादरले.
पश्चिम इराणच्या इजीह शहरातील सेंट्रल बाजारात काहीजण बुधवारी आंदोलन करत होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या २ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात ५ जण ठार झाले. त्यात एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे. या गोळीबारात १० जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती प्रांताचे गव्हर्नर खुजेस्तान यांनी दिली. सेंट्रल बाजारात जमलेला जमाव सरकार विरोधी घोषणा देत होता. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस आणि आंदोलक यांच्यात हा प्रकार सुरू असतानाच तेथे गोळीबार झाला.