संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्दुल लतीफ रशीदांची निवड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बगदाद – इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्दुल लतीफ रशीद यांची निवड झाली आहे. त्यामुळे वर्षभरापासून सुरू असलेली राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर संपली. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष निवडीचे तीन प्रयत्न अपयशी ठरले होते. दोन तृतीयांश बहुमत मिळत नसल्यामुळे या पदाची निवडणूक लांबली होती.
इराक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुर्दिश राजकारणी अब्दुल रशीद यांना खासदारांनी निवडून दिले आहे. या निवडणुकीत रशीद यांना १६० तर त्यांचे प्रतिस्पर्धी बरहम सालेह यांना ९९ मते मिळाली. गुरुवारी मतदानाच्या दोन फेऱ्या झाल्या. त्यानंतर ७८ वर्षांच्या रशीद यांना विजयी म्हणून घोषित केले. रशीद उच्चशिक्षित अभियंता आहेत. २०२२३ ते २०१० पर्यंत ते इराकचे जलसंपदा मंत्री होते. ते आता सालेह यांची जागा घेतील. सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या संसदीय गटाला ते आमंत्रित करतील. नवे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे १५ दिवस आहेत. इराकच्या पंतप्रधानपदी ते कोणाला नियुक्त करतील हे आत्ताच सांगता येत नाही. हे पद अतिशय वादग्रस्त आहे. इराकच्या राष्ट्रपतीपदासाठी पहिल्या फेरीत दोन तृतीयांश बहुमत मिळणे आवश्यक असते. यापूर्वी ७ फेब्रुवारी ते ३० मार्च दरम्यान नवीन राष्ट्रप्रमुख निवडीचे तीन प्रयत्न झाले. परंतु ते अपयशी ठरले. शेवटी काल झालेल्या मतदानात रशीद यांची निवड झाली. या निवडणुकीत ३२९ पैकी २७९ खासदारांनी मतदान केले. त्यात रशीद यांना १६० आणि सालेह यांना ९९ मते मिळाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या