संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

इम्रान यांचा आजपासून लाँग मार्च पुन्हा इस्लामाबादकडे कूच करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद- माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानात राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. पाकिस्तानी लष्कराचा सध्या सर्वात वाईट काळ सुरू आहे.कारण स्वत:च्या बचावासाठी पाक लष्कराला पहिल्यांदाच पुढाकार घ्यावा लागला आहे.पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची राजकीयदृष्ट्या काेंडी झाल्याने त्यांना लष्कराचा आश्रय घ्यावा लागत आहे. वुडराे विल्सन सेंटरचे एशिया प्राेग्रामचे उपसंचालक मायकल कुगेलमॅन म्हणाले, सद्यस्थितीत राजकीयदृष्ट्या पाकिस्तान स्फाेटकांच्या राशीवर आहे,असे म्हणावे लागेल.कधीही स्फाेट हाेऊ शकताे.त्यातच इम्रान खान यांनी उद्या मंगळवार ८ नोव्हेंबरपासून इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला जाईल,असे जाहीर करून टाकले आहे.
पाकिस्तानवर सुमारे ४३ लाख काेटी रुपयांच्या कर्जाचा डाेंगर आहे. त्यामुळेच पाकिस्तान चीन, साैदी अरेबिया तसेच इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर अवलंबून राहावे लागते. शाहबाज सरकारने कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी चीन व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या संस्थांकडे आर्जव केले आहे.नाणे निधीचा हिरवा कंदील मिळावा यासाठी शाहबाज सरकारने पेट्राेलियम पदार्थांचे दर वाढवले आहेत. म्हणूनच पाकिस्तानात महागाईचा दर सर्वाधिक १६ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये शाहबाज सरकारच्या विराेधात राेष आहे.आपल्यावरील हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान, मंत्री तसेच मेजर जनरल नसीर यांच्या विराेधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर ते अडून आहेत. पंजाबमध्ये इम्रान यांच्या आघाडीचे सरकार आहे.परंतु पंजाबचे मुख्यमंत्री परवेझ इलाही, मेजर जनरल नसीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami