संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टरचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर उडल्यानंतर काही वेळातच त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे इम्रान खान यांच्या हेलिकॉप्टरचे गुजरांवाला येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. इम्रान खान हे एका सभेसाठी गुजरावाला येथे जात होते. विमानातील बिघाडानंतर ते रस्ते मार्गाने सभेसाठी रवाना झाले. सभेत बोलताना त्यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami