संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

इतिहासाच्या पुस्तकात पृथ्वीराज यांच्या पराक्रमाबद्दल एकही धडा नाही !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : अक्षय कुमारचे चाहते त्याच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सुपरस्टार अक्षय कुमार सध्या ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याबाबत तो अनेक बाजूंनी वक्तव्ये करत आहे. त्याच्या अशाच एका वक्तव्यामुळे तो सध्या ट्रोलचा शिकार झाला आहे. अक्षय कुमार याने एका मुलाखती दरम्यान,’इतिहासाची पाठ्यपुस्तके मुघल आक्रमणकर्त्यांच्या माहितीने भरलेली आहेत परंतु पृथ्वीराज चौहान आणि महाराणा प्रताप यांसारख्या राजांच्या वैभव आणि पराक्रमाबद्दल एकही धडा नाही, असे सांगताना दिसत आहे. अक्षय कुमारच्या या विधानावर तो नेटकऱ्यांकडून ट्रोल होताना दिसत आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचं प्रमोशन करत असतानां हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पृथ्वीराज आणि मुघल यांच्याबाबत अक्षयने केलेल्या या वक्तव्यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अक्षयला ट्रोल केलं आहे. एका युझरनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दोन धडे आहेत. कुमार यांना प्रमोशनमधून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी हे वाचायला पाहिजे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिले, ‘वरवर पाहता अक्षय कुमार कधीही भारतात शाळेत गेले नाहीत किंवा एनसीइआरटी पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला नाही. आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट केले, “मला वाटते की त्याला एनसीईआरटी इतिहासाची पुस्तके वाचण्याची गरज आहे, विशेषत: इयत्ता ७वी ची.’ तर पृथ्वीराज यांनी लिहिले की, ‘तुम्ही भारतात कुठे शिकलात, जिथे पृथ्वीराज चव्हाण आणि महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे धडे दिले गेले नाहीत.’ अखिलेश त्रिपाठी यांनी लिहिले की, ‘कॅनडियन बाबू इतके महान इतिहासकार कधी झाले की ते इतिहासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. यादवेंद्र कुमार त्यांनी लिहिले की, ‘ते भारतीय नागरिक नाहीत आणि त्यांना इतिहास माहीत नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami