संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीनी घेतली शपथ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रोम – इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून जॉर्जिया मेलोनी यांनी काल शनिवारी शपथ घेतली.गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाने विजय मिळवला होता. शनिवारी मेलोनी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला.

दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीत पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधानपदाची संधी मिळाली आहे. मेलोनी यांच्या आघाडीमध्ये मॅटीओ साल्विनी यांच्या राईट विंग लीग आणि माजी राष्ट्राध्यक्ष सिल्वियो बर्लुस्कोनी यांच्या फोर्झा इटालिया पार्टिचाही समावेश आहे.गेल्या काही काळामध्ये कडव्या उजव्या विचारसरणीच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून मेलोनी उदयास आल्या आहेत.रशिया-युक्रेन युद्धाबाबत इटलीच्या भुमिकेवरून संशय निर्माण झाल्यानंतर मेलोनी यांनी तत्काळ झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करत युक्रेनला पाठिंबा दर्शविला होता.४५ वर्षीय मेलोनी यांच्या पक्षाला चार वर्षांपुर्वीच्या निवडणुकीत केवळ ४.१३ टक्के मते मिळाली होती.यंदाच्या निवडणुकीत त्यांना २६ टक्के मते मिळाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami