संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

इगतपुरीत ‘त्या’ कारमध्ये सापडलेला मृतदेह निवृत्त लष्करी जवानाचा !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*घातपात की अपघात? *पोलिसांकडून तपास सुरू

नाशिक- इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेवाडी शिवारात मंगळवारी जळालेल्या स्थितीतील कारमध्ये जळून खाक झालेल्या मृतदेहाची ओळख पाेलिसांना पटली असून हा मृतदेह चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी आता त्यानुसार पुढील तपासाची चक्रे फिरविली आहेत.
इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात एक कार जळाल्याची माहिती मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला असता ही घटना २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या जळालेल्या कारमध्ये एक अज्ञात व्यक्तीही जळाल्याचे समोर आले होते.त्यामुळे ही गाडी व संबंधित मृतदेह कुणाचा असावा याबाबत तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. या जळीतकांडात जळालेली व्यक्ती पुरुष असल्याचे वैद्यकीय अहवालावरून निष्पन्न झाल्यानंतर घोटी पोलिसानी तपासाची चक्रे फिरवली.
त्यात संबंधित व्यक्ती चांदवड तालुक्यातील न्हनावे येथील निवृत्त लष्करी जवान संदीप पुंजाराम गुंजाळ (३६) असल्याचे निष्पन्न झाले.दोन महिन्यांपूर्वीच लष्करी सेवा संपवून, संदीप गुंजाळ हे निवृत्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. निवृत्तीनंतर त्यांनी इगतपुरी तालुक्यातील एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी सुरू केली होती, असेही सांगितले जात आहे. चांदवडवरून ते इगतपुरी येथे ये-जा करत असत. सदर कंपनी व जळीतकांड घडलेले ठिकाण १२ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने, त्याच परिसरात असल्याने गुंजाळ यांचा घातपात झाला असल्याचा कयास पोलीस सूत्रांच्या वतीने वर्तविला जात आहे. या घटनेचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. या जळीतप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami