संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

इक्वॉडोरमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप! १८ ठार, अनेक जण ढिगाऱ्याखाली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इक्वॉडोर : इक्वॉडोअर आणि उत्तर पेरूमधील किनारपट्टी भागात झालेल्या शक्तिशाली भूकंपात १८ लोक ठार झाले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे अनेक घरे, शाळा आणि रुग्णालयाच्या इमारतींना तडे गेले आहेत.

शनिवारी इक्वेडोरच्या किनारी ग्वायास प्रदेशात ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. देशाचे दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या ग्वायाकिलच्या आसपासचा परिसर भूकंपाने हादरला. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. यात १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंप इतका जोरदार होता की, त्याचे धक्के शेजारील देश पेरूलाही जाणवले. पेरूमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे दक्षिण इक्वेडोर आणि उत्तर पेरूमधील इमारतींचेही नुकसान झाले.

बचाव पथक भूकंपग्रस्त भागात पोहोचले असून बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. मात्र मोठ्या भागात वीज खंडित झाल्यामुळे बचावकार्यात मोठी अडचण येत आहे. इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी ट्विट करून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. इ”आपत्कालीन परिस्थितीत सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे क्वेडोरचे अध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या